|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » खासगी गुप्तहेर रजनी पंडीत यांची जेलमधून सुटका

खासगी गुप्तहेर रजनी पंडीत यांची जेलमधून सुटका 

ऑनलाईन टीम / मुंबई

कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) गहाळकेल्या प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची ठाणे कारागृहातून तब्बल चाळीस दिवसांनंतर सुटका करण्यात आली आहे.

ठाणे न्यायालयाच्या काही महत्वाच्या अटी आणि शर्तीवर रजनी पंडित यांना 20 हजार रूपयांचा जामीन मंजूर झाला आहे. सीडीआर प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जायचे आणि विकण्यात यायचे असा आरोप त्यांच्यावर आहे. ठाणे क्राईम ब्रँचने दादरमधून रजनी पंडित यांना अटक केली होती. या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या हाती आतापर्यंत अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांसह पोलिसही चौकशीच्या घेऱयात आले आहेत.

ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले होते की, सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करून त्याची विक्री करत असत. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. तसेच, एअरटेल, एअरसेल, व्होडाफोन, आयडिया, टाटा, यूनिनॉर आणि जिओ या सात कंपन्यांच्या मोबाईल नंबरचे सीडीआर आरोपींनी पैसे देवून खरेदी केले होते. त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते की, टेलिकॉम कंपन्यांना माहिती असल्याशिवाय कोणत्याही मोबाईल नंबरचे सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड मिळू शकत नाही. त्यामुळे पोलिस आता टेलिकॉम कंपन्यांची चौकशी करणार आहे, जेणेकरून सीडीआर कंपनीकडून चोरला गेला की या कंपन्यांमधील कुणी व्यक्ती या प्रकरणात सहभागी आहे.

रजनी पंडित यांना लेडी जेम्स बाँड असेही म्हणले जाते. 1991 मध्ये त्यांनी अधिकृतपणे खाजगी गुप्तहेर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. दरम्यान, दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेवून त्या माध्यमांशी संवाद साधतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रजनी पंडित माध्यमांसमोर नक्की काय भूमिका मांडतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related posts: