|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » बिल्डरकडे 20 कोटींची खंडणी मागणाऱया जिल्हा परिषद सदस्याला अटक

बिल्डरकडे 20 कोटींची खंडणी मागणाऱया जिल्हा परिषद सदस्याला अटक 

ऑनलाईन टीम / पुणे :

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱया जिल्हा परिषद सदस्याला अटक करण्यात आली. गुलाब पारखे असे या आरोपीचे नाव असून तो पुण्यातील जुन्नर येथील जिल्हा परिषद सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे पवईत कार्यालय आहे. बांधकाम व्यावसायिकाबाबत गुलाब पारखेने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून त्याच्याकडून खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर माहिती उघड केली जाईल, अशी धमकी तो बिल्डरला देत होता.

बिल्डरने काही महिन्यांपूर्वीच गुलाब पारखेला 10 लाख रुपये दिले होते. मात्र, तेवढय़ावर त्याचे समाधान झाले नाही आणि त्याने बिल्डरकडे थेट 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर प्रसारमाध्यमांसमोर सर्व माहिती उघड केली जाईल, अशी धमकी तो वारंवार देत होता. गुरुवारी सकाळी बिल्डरच्या कार्यालयातून एका कर्मचाऱयाने पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच खंडणीची मागणी करणारे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना पुरावा म्हणून दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सापळा रचून मुलुंड येथील एका हॉटेलमधून गुलाब पारखेला अटक केली. 20 कोटींपैकी 2 कोटी रूपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Related posts: