|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीयांना पर्यटनाची आवड

भारतीयांना पर्यटनाची आवड 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारतीय लोकांना खरेदी करणे, जेवण करणे याच्यापेक्षा पर्यटन करणे सर्वात जास्त आवडते. असे एका सामाजिक सेवा संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये निष्कर्ष निघाला आहे. 38 टक्के लोकांना पर्यटनावर पैसे खर्च करणे अधिक आवडते, असे मत व्यक्त केले आहे. पर्यटनावर खर्च करण्यासाठी भारतीय लोक बचत करत असल्याचे समोर आले आहे.

भारतातील केवळ तरुण वर्गालाच पर्यटनाची आवड आहे असे नाही. वय वर्ष 36 ते 55 वर्षापर्यंतचे सर्वच लोक पर्यटनात पुढे आहेत. या वयोगटातील 47 टक्के लोकांनी आपल्याल फिरणे पसंत असल्याचे मान्य केले आहे. ‘ट्रव्हल सर्च पोर्टल’ च्या सर्व्हेमध्ये हय़ा गोष्टी समोर आल्या. जानेवारीमध्ये हा सर्व्हे झाला. यामध्ये 1,004 लोकांचा समावेश होता.

सर्व्हेमध्ये असे समोर आले की, 16 टक्के लोक उन्हाळी पर्यटनासाठी सरासरी 3 लाखाहून अधिक पैसे खर्च करण्याची तयारी ठेवतात. तर 45 टक्के लोकांनी पर्यटनावर 1 लाख रुपये खर्च करणार असल्याचे स्पष्ट केले. टॅव्हल पोर्टल कायकचे संचालक अभिजीत मिश्रांनी सांगितले की, पर्यटन क्षेत्रात बदल झपाटय़ाने होत असून, फिरणे, आवडत्या स्थळांना भेट देणे हा एक आवडता छंद झाला आहे.