|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » बोइंगच्या ‘सुपर हॉर्नेट’वर भारताची नजर

बोइंगच्या ‘सुपर हॉर्नेट’वर भारताची नजर 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारतीय वायूदलासाठी लढाऊ विमानांची मागणी पूर्ण करण्याच्या शर्यतीत अमेरिकेची एअरक्राफ्ट कंपनी बोइंग देखील सामील झाली आहे. एकच इंजिन असणाऱया 100 विमानांचा पुरवठा करण्यासाठी अगोदर लॉकहीड मार्टिक कॉर्पचे एफ-16 आणि साब एबीच्या ग्रिपेनदरम्यान चढाओढ दिसून येत होती. परंतु मोदी सरकारने ट्विटन (दोन) इंजिनांच्या विमानाच्या खरेदीवर भर दिल्याने बोइंग आता दोन्ही कंपन्यांशी स्पर्धा करू शकते. सध्या जगात एकमात्र रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्सच सुपर हॉर्नेटचा ग्राहक आहे.

मोदी सरकारच्या योजनेत बदलानंतर या मागणीचे मूल्य 15 अब्ज डॉलर्सपर्यंत (97500 कोटी रुपये) पोहोचू शकते. सरकार वायूदलाच्या ताफ्याला बळ देण्याच्या दिशेने अत्यंत वेगाने काम करत असल्याने ही योजना देखील महत्त्वाची मानली जातेय.

मार्टिन कॉर्प आणि साब एबीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया पुढाकारांतर्गत स्थानिक कंपन्यांसोबत भागीदारीने देशात विमानांच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला असून यामुळे आयातीवरील निर्भरता कमी करण्यास मदत होणार आहे.

वायूदलाला निर्देश

फेब्रुवारीमध्ये सरकारने वायूदलाला ट्विटन इंजिन विमान खरेदी प्रक्रिया सुरू करणे आणि बोइंगच्या एफ/ए-18 सुपर हॉर्नेटचा अभ्यास करण्याचा निर्देश दिला होता. भारतीय नौदलाने 8-9 अब्ज डॉलर्समध्ये 57 लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी सुपर हॉर्नेटचा यादीत समावेश केला आहे.

आरएफआय लवकरच

या व्यवहाराच्या पहिल्या टप्प्यानुसार लवकरच संरक्षण मंत्रालय रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन (आरएफआय) प्रसिद्ध करू शकते. एक तसेच दोन इंजिनयुक्त लढाऊ विमानांदरम्यान चढाओढ असेल, परंतु लॉकहीड आणि साबने नव्या अटींबद्दल काहीच कळविले नसल्याचे अधिकाऱयाने सांगितले.

विमानांची कमतरता

भारतात मागील 15 वर्षांपासून नव्या लढाऊ विमानांची कमतरता जाणवत आहे. अनेकदा घोषणा होऊन देखील आवश्यकतेच्या तुलनेत केवळ तीन-चतुर्थांश लढाऊ विमानेच वायूदलाच्या ताफ्यात समाविष्ट आहेत.

 

 

 

Related posts: