|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चोरटय़ांचा धुमाकूळ, रात्रीत सात ठिकाणी लुटालूट

चोरटय़ांचा धुमाकूळ, रात्रीत सात ठिकाणी लुटालूट 

सांगली :

 शहरात वाटमाऱया करणारे निष्पन्न झाले असून त्यांना लवकरच जेरबंद करण्याची ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी देऊन दोन दिवस होण्यापूर्वीच चोरटय़ांनी सांगलीसह परिसरात पुन्हा धुमाकूळ घातला. नाकाबंदी आणि रात्र गस्त असतानाही रात्रीत सात ठिकाणी लुटमार करण्यात आली. भर दिवसा एक फ्लॅट फोडण्यात आला आहे. यामध्ये सात तोळे सोने आणि सुमारे अडीच लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. कवलापूर येथे चोरटय़ांनी केलेल्या तलवार हल्ल्यात दुकानदार जखमी झाला आहे. चोरटय़ांनी पोलिसांसमोर निर्माण केलेल्या या आव्हानामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 सांगलीतील किसान चौकात राहणारे सुधीर शिवलिंग सगरे (वय 46) यांचे शंभर फुटी रस्त्यावर भोजनालय आहे. त्यांना मधुमेहाचा आजार आहे. मधुमेहावरील औषध संपल्याने बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास शंभर फुटी रस्त्यावरील दिगंबर मेडीकलमध्ये ते औषधे आणण्यासाठी गेले होते. दुकानासमोरच स्प्लेंडरवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या आडवी गाडी मारली. त्यांना चाकूचा धाक दाखवत दमदाटी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भांबावलेल्या सगरे यांना काही कळण्यापूर्वीच त्यांची अडीच तोळय़ांची चेन हिसडा मारून चोरटय़ांनी धूम ठोकली. सगरे यांनी आरडाओरड केली. पण, चोरटे वाऱयाच्या वेगाने पसार झाले. सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली आहे. रात्री उशीरा पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. पण चोरटे सापडले नाहीत.

  डिग्रज येथील सौ. स्मिता राजेंद्र सूर्यवंशी (वय 30) ही महिला बुधवारी दुपारी वडापने कर्नाळला निघाली होती. बुधवारी दुपारी वडापमध्ये बसण्यापूर्वी  त्यांनी   अडीच तोळय़ांचे गंठण आणि अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पर्समध्ये काढून ठेवली होती. एक हजारांची रोकडही त्यांनी पर्समध्येच ठेवली होती. गाडीतून उतरल्यानंतर सांगलीतच त्यांची पर्स लांबवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनीही सांगली शहर पोलीसात धाव घेतली आहे.

Related posts: