|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कवायत संचलन स्पर्धेमध्ये साई इंग्लिश मिडीयमचे यश

कवायत संचलन स्पर्धेमध्ये साई इंग्लिश मिडीयमचे यश 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, संभाजीनगर येथे झालेल्या तालुका शहरस्तरीय एमसीसी कवायत संचलन स्पर्धेमध्ये 13 शाळा सहभागी  झाल्या होत्या. या शाळांमधून साई इंग्लिश मिडीयम स्कूल जरगनगर शाळेतील एमसीसी कॅडेटनी सलग तिसऱया वर्षी प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. या सर्व कॅडेटची निवड जिल्हा स्तरीय होणाऱया एमसीसी कवायत संचलन स्पर्धेसाठी झाली. सर्व एमसीसी कॅडेटना संचालिका पूजादेवी पाटील, ऍड. वि. एम. पाटील, मुख्याध्यापक रवींद्र कुंभार, योगिता कोगेकर, संगीता सरनाईक व क्रीडा शिक्षक प्रशांत मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts: