|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » संजयगांधी योजनेच्या अर्थसहाय्य वाटपात घोटाळा

संजयगांधी योजनेच्या अर्थसहाय्य वाटपात घोटाळा 

किरण बनसोडे / सोलापूर

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना तसेच सामाजिक अर्थ सहाय्य योजनेंतर्गत मानधनाच्या रकमेवर दलालांकडून डल्ला मारला जात आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमहा 600 रुपये मानधन असताना बँक खात्यावर चक्क हजारो रुपयांची रक्कम जमा केली जाते आणि ती रक्कम संगनमताने दलालांकडून काढून घेतली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा पद्धतीने निराधारांचे मानधन हडपण्याचा गोरख धंदा सुरु आहे. यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून, घोटाळा झाला असल्याची बाब पुढे आली आहे. 

राज्य शासन पुरस्कृत सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना व आम आदमी विमा योजना आदी योजना जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या संजय गांधी योजना जिल्हा शाखेकडून राबविल्या जातात. या विविध योजनांचे मानधन संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट शासनाकडून जमा केले जाते.

या योजना मिळवून देण्यासाठी दलाल (एजंट) कार्यरत आहेत. या दलालांकडून निराधारांच्या मानधनावर डल्ला मारण्याचे काम सुरु आहे. काही दलालांकडे चक्क 50 ते  शंभर लाभार्थ्यांचे पासबुक असल्याचे समजते. मानधन जमा झाल्यानंतर हे एजंटास संबंधित लाभार्थ्यांना साबत घेऊन बँकेत जातात आणि जमा झालेली रक्कम काढून घेतात. विशेष म्हणजे दरमहा 600 रुपये मानधन असतानाही काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 12 हजार ते 48 हजार रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यावरुन जमा झाल्याचे निदर्शनात आले आहे. ती रक्कम तत्काळ एजंटकडून काढून घेतले जात असल्याचा संशय आहे. अशा पद्धतीने काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर हजारो रुपयांच्या रक्कमा जमा झाल्या असल्याची शक्यता आहे. अधिकची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून कशी काय जमा केली जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संजय गांधी योजना सोलापूर शहर मध्य समिती अंतर्गत एकूण सुमारे 11 हजार लाभार्थी आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील मानधनाची रक्कम संगनमत करुन दलालांकरवी काढून घेण्यात येते. ही गंभीर बाब आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निराधारांना मानधनाच्या रुपात आधार देण्यात येतो मात्र या योजनेच्या मानधन रकमेत अपहार करुन डल्ला मारला जात आहे.

या योजनेतील मानधन परस्पर संगनमतातून वापरण्यात येत आहे. दलालांच्या मानधनाचा मोठय़ा प्रमाणात वाटप केला जात आहे. या संदर्भात शहर मध्य समितीतील काही सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Related posts: