|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » हलक्या पावसाच्या अदांजामुळे शेतकऱयांची चिंता वाढली

हलक्या पावसाच्या अदांजामुळे शेतकऱयांची चिंता वाढली 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

राज्यात काही ठिकाणी झालेल्या रिमझिम पावसाचा फटका अनेक पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढचे 2 दिवस हे वातावरण असेच राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहे.त्यामुळे शेतकऱयाच्या चिंतेत भर घातली आहे.

कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसणा आहे.तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात गहू आणि द्राक्ष पिकाचे नुकसान होणार आहे. आज मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहील. या भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कापणी केलेला शेतमाल उघडय़ावर ठेऊ नये,असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.