|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » अहंकारी मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले : सोनिया गांधी

अहंकारी मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले : सोनिया गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मागच्या चार वर्षात केंद्रातल्या अहंकारी नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले.पण काँग्रेस झुकली नाही आणि झुकणारही नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचे घोटाळे, भ्रष्टाचार आम्ही उघड करत राहु ,असे व्यक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे.

देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे आणि त्या जोरावर पक्ष पुन्हा भरारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अत्यंत आव्हानात्मक काळात राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असून व्यक्तिगत आशा-अपेक्षा, अहंकार दूर सारून सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही सोनिया गांधींनी केले.

 

 

Related posts: