|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » राज्यात गुढी उभारून जल्लोषात नववर्षाचे स्वागत

राज्यात गुढी उभारून जल्लोषात नववर्षाचे स्वागत 

ऑनलाईन टीम / पुणे

राज्यात आज गुढी उभारून सर्वीकडे नववर्षाचे स्वागत केले जात आहे. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक या दिनाचे औचित्य साधून राज्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यासह देशभर मोठमोठय़ा स्वागतयात्रा आयोजित केल्या आहेत.

 मुंबईतील गिरगावासह डोंबिवली, ठाणे, पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नांदेड, आदी शहरांमध्ये सकाळपासूनच शोभायात्रांना सुरूवात झाली. ढोलताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्य, आणि पारंपरिक कपडे परिधान करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी पर्यावरणाचे सवंर्धन करण्याबरोबर सामाजिक संदेशाच्या गुढीही उभारण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारण्यासोबतच दाराला तोरण लावून नववर्षाचे स्वागत केले जाते. थ्यामुळे पारंपरिक झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. शिवाय तोरणं, श्रीखंड यांची खरेदीही जोरात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पाहायलाही मिळणार आहे.

 

Related posts: