|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत जमावाच्या हल्ल्यात पाचजण जखमी

रत्नागिरीत जमावाच्या हल्ल्यात पाचजण जखमी 

प्रतिनिधी

रत्नागिरी / गुढीपाडवा सणानिमित्त रस्त्यावर रांगोळी काढत असताना गाडी बाजूने नेण्यास सांगितले, या रागातून 16 जणांच्या जमावाने हल्ला करून 5 जणांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल़ी जखमींमध्ये भाजपा नगरसेवक समीर तिवरेकर, मंदार मयेकर, आदित्य पांचाळ, पराग तोडणकर, सुनील सावंत यांचा समावेश असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत़ या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

राजेश कृष्णा तोडणकर (45, ऱा मानस अपार्टमेंट, विठ्ठलमंदिर शेजारी) यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आह़े पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी चिम्या दामोदर साबळे (28), स्मित संजय साळवी (28), उदय विलास सावंत (38) यांना अटक केली असून यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल केला आह़े यामध्ये नागेश गजबार, स्वप्निल साबळे, प्रवीण साबळे, शुभम साळवी, मयुर भुवड, इंद्रनिल साबळे, अथर्व खेडेकर (सर्व ऱा झाडगाव) व अन्य 6 जणांचा समावेश आह़े

शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शहरातील विठ्ठल मंदिरासमोरील रस्त्यावर जखमी मंदार मयेकर व त्यांचे साथीदार हे रांगोळी काढत असताना चिम्या साबळे हा आपली इनोव्हा घेवून जात होत़ा त्यावेळी रांगोळी काढत असल्याने गाडी बाजूने घेवून जा, असे मयेकर यांनी त्याला सांगितल़े यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल़ा यावर संशयित आरोपी याने झाडगाव येथून आपले साथीदार यांना बोलावून आणत बेस बॉल स्टीक, हॉकी स्टीक, काठय़ांनी हल्ला करून मारहाण करण्यास सुरूवात केल़ी

या मारहाणीत पाचजण जखमी झाले असून मंदार मयेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आह़े या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 16 जणांविरूद्ध बेकायदा जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी भादंवि कलम 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तपास करत आहेत़