|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » अप्रेंटिसच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा

अप्रेंटिसच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा 

ऑनलाईन टीम / मुंबई

मुंबईकरांचीअप्रेंटिसच्या उमेदवारांकडून तब्बल साडेतीन तास रेल रोको करण्यात आला.अप्रेंटिसच्या उमेदवारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मनसेचे शिष्टमंडळ उद्याला दिल्लीत जाऊन पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत.

मनसेच्या शिष्टमंडळामध्ये बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, नितीन सरदेसाई, मनोज चव्हाण यांचा समावेश असून यात प्रशिक्षणार्थी सोबत असणार आहेत. आज प्रशिक्षणार्थींनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी प्रशिक्षणार्थींना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. आंदोलकांसोबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी तुमच्यासोबत येतील आणि मागण्या मान्य करून घेऊ, असे आश्वासन राज ठाकरे यांनी आंदोलकांना दिले.

रेल्वे ऍप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्या काय आहेत ?

– 20 टक्के कोटा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.

– रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामाविष्ट करण्यात यावे.

– रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोटय़ाअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावे, भविष्यातही नियम लागू ठेवावा.

– याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये.

 

Related posts: