|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » उद्योग » वाढत्या संरक्षणवादाने भारतीय कंपन्या चिंतित

वाढत्या संरक्षणवादाने भारतीय कंपन्या चिंतित 

अनेक देशांच्या सरकारकडून संरक्षणवादाचे समर्थन : व्यवसायाला बाधा

 वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत्या संरक्षणवादाबाबत भारतीय कंपन्या चिंताग्रस्त असल्याचे म्हणण्यात आले. संरक्षणवादामध्ये वाढ झाल्याने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

एचएसबीसीकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील 26 देशांतील 6 हजार कंपन्यांमधून नमूने गोळा करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सरासरीपेक्षा सरकारकडून लादण्यात येणाऱया संरक्षणवाद अधिक धोकादायक असल्याचे 10 पैकी 9 भारतीय कंपन्यांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या सर्वेमध्ये 61 टक्के कंपन्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून संरक्षणवाद मोठय़ा प्रमाणात स्वीकारण्यात येत आहे, असे म्हणण्यात आले. संरक्षणवादामध्ये वाढ होत असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार करणे अधिक आव्हानदायक होत आहे. पश्चिम आशियामध्ये सर्वाधिक संरक्षणवाद दिसून येत असून तेथे प्रमाण 70 टक्के, आशिया पॅसिफिकमध्ये 68 टक्के आहे. अमेरिकेमध्ये वाढ होत असल्याचे 61 टक्के जणांचे मत असून युरोपमध्ये प्रमाण 50 टक्के आहे.

सरकारकडून संरक्षणवादाचे समर्थन करण्यात येत असल्याने व्यवसाय खर्चात वृद्धी होते. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांसमोर आव्हान तयार झाले आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी कंपन्यांकडून स्थानिक पातळीवरून अधिक प्रतिसाद मिळण्यासाठी पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यात येत आहे, असे एचएसबीसी इंडियाच्या व्यावसायिक बँकिंगचे प्रमुख रजत वर्मा यांनी सांगितले.

आता कंपन्या स्थानिक पातळीवरील मॉडेलना भर देत आहेत, भागीदारीने कंपनी स्थापन करणे, उपकंपनीला अधिक भांडवल पुरविणे, ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. स्थानिक पातळीवरील कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यासाठी दिग्गज कंपन्या प्रयत्न करत आहेत. पुढील तीन ते पाच वर्षात भागीदारीने कंपनी स्थापन करण्याचा ट्रेन्ड कायम राहण्याचा कयास आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या आपल्या विस्तारावर अधिक भर देत आहेत. 77 टक्के कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढणार आहे आणि पुढील 12 महिन्यात व्यवसायात वाढ होईल असे त्यांना वाटते.

Related posts: