|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » बारावीच्या निकालावर टांगती तलवार

बारावीच्या निकालावर टांगती तलवार 

ऑनलाईन टीम / मुंबई

बारावीची परीक्षा सुरू असतांना, बारावीचा निकाल वेळेवर लागेल याची शाश्वती नाही. कारण अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्यासोबत कालच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

शिक्षक महसंघाने येत्या 26 मार्च रोजी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पण तरीही शासनाने निर्णय न घेतल्यास तपासलेल्या उत्तर पत्रिका आणि मार्कशीट बोर्डात जमा न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याचा निकालावर परिणाम झाल्यास शासन जबाबदार असेल असे संघटनेने म्हटले आहे. याआधीही 5 मार्चला शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन मागे घेतले होते. पण अजूनही शासनाने प्रमुख मागण्यांवर निर्णय घेतला नाही. दुसरीकडे कनि÷ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कारासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार असून, त्यांच्यामुळे शिक्षकांवर संप करण्याची वेळ आली आहे. असा घरचा आहेर भाजप समर्थित शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 5 जून पूर्वी 12 वीचा निकाल लागणे अपेक्षित आहे. पण शिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीचे 65 लाख पेपर तापसणीविना धुळखात पडून आहेत.