|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » अमेरिकेत व्याजदर वाढीने बाजारात दबाव

अमेरिकेत व्याजदर वाढीने बाजारात दबाव 

वृत्तसंस्था /मुंबई :

अमेरिकेत व्याजदरात वाढ आणि व्यापार युद्ध वाढण्याच्या संकेताने भारतीय बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.4 टक्क्यांनी घसरत बंद झाला. सत्रातील तेजीदरम्यान निफ्टी 10,200 या महत्त्वपूर्ण पातळीला पार करण्यास यशस्वी ठरला होता, तर सेन्सेक्स 150 अंशाने वधारला होता. मात्र दिवसअखेरीस बाजार घसरण होत बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही दबाव आला होता. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.75 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.8 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला.

बीएसईचा सेन्सेक्स 130 अंकाने घसरत 33,006 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 40 अंकांच्या कमजोरीने 10,115 वर स्थिरावला.

बँकिंग, वाहन, आयटी, औषध, रिअल्टी, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात विक्री दिसून आली. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरत 24,141 वर बंद झाला. निफ्टीचा पीएयसू बँक निर्देशांक 2 टक्के, वाहन निर्देशांक 0.9 टक्के, आयटी निर्देशांक 1 टक्क्यांनी कमजोर झाले. मात्र धातू समभागात काही प्रमाणात खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

वेदान्ता, ओएनजीसी, टाटा मोटर्स, रिलायन्स इन्डस्ट्रीज, इन्डसइंड बँक, टाटा मोटर्स डीव्हीआर 2.5-0.7 टक्क्यांनी वधारले. बीपीसीएल, एचपीसीएल, एसबीआय, विप्रो, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी 3.7-2 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात नाल्को, सीजी कंज्युमर, सेल, सेन्ट्रल बँक, टोरेन्ट फार्मा 5.8-1.3 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स कम्युनिकेशन्स, वक्रांगी, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल, अशोक लेलँड 5.4-3.8 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात एस्टेक लाईफ, एन्डय़ू यूल, टीआरएफ, एचओईसी, हॅथवे केबल 6.5-4.2 टक्क्यांनी मजबूत झाले. एचसीसी, ला ओपाला, ओरिएन्टल व्हिनियर, मर्केटर, टीबीजी बँक्वेट्स 17.3-6.9 टक्क्यांनी घसरले.

Related posts: