|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘म्हैसाळ’सह तीन योजनांसाठी 30 कोटींचा निधी मंजूर

‘म्हैसाळ’सह तीन योजनांसाठी 30 कोटींचा निधी मंजूर 

प्रतिनिधी मिरज   

जिह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू पाणी योजनांच्या थकीत वीज बिलासाठी कृष्णा खोरे महामंडळाच्या स्वनिधीतून 30 कोटी रुपये देण्याच्या निर्णयावर गुरूवारी मुंबईत शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आमदार सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली. राज्यातील भाजपा शासन शेतकऱयांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगत, दोनच दिवसात म्हैसाळ प्रकल्पाचे आवर्तन सुरू होईल, असा दावाही खाडे यांनी केला.

थकीत वीज बिलामुळे म्हैसाळ प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्पातून आवर्तन बंद आहे. यामुळे लाभधारक शेतकऱयांना आर्थिक फटका बसू लागला होता. याची आम्हाला पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे थकीत वीज बिलाचा योग्य निर्णय लावून प्रकल्पातून आवर्तन सुरू करावे, यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू केला होता. खासदार संजय पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेउढन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली होती. पण, थकीत वीज बिलास कोणत्या विभागातून निधी द्यायचा? यावर चर्चा रंगल्याने आमच्या अपेक्षेप्रमाणे त्यास तात्काळ निधी उपलब्ध होऊ शकला नाही. पण आज या योजनांना 30 कोटींचा निधी मंजूर करुन शासनाने आपण शेतकऱयांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत, हेच दाखवून दिले आहे.

Related posts: