|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मार्केटमधील समस्यांचे समाधान करणारः बाबुश मोन्सेरात

मार्केटमधील समस्यांचे समाधान करणारः बाबुश मोन्सेरात 

प्रतिनिधी/ पणजी

पणजी मार्केटची पूर्णपणे र्दुदशा झाली आहे. गटारे कचऱयाने तुडूंब भरलेली आहेत. पाणी जाण्यास कुठल्याही प्रकारची वाट मार्केटमध्ये नाही. हा विषय अधिक गंभीर असून यावर एका महिन्याच्या आत तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती बाबुश मोन्सेरात यांनी दिली.

शुक्रवारी पणजीचे नवनिर्वाचीत महापौर विठ्ठल चोपडेकर, बाबुश मोन्सेरात, बाजार समितीचे प्रमुख उदय मडकईकर व इतर अधिकाऱयांनी मार्केट परीसराची पाहणी केली. यावेळी मोन्सेरात यांनी ही माहिती दिली. यादरम्यान दुकानदारांनी आपली समस्या त्यांना सांगितल्या.

माजी महापौर यांनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना मार्केटच्या हितासाठी केली नाही. येथील दुकानदार सांगतात की केव्हा मार्केटची पाहणी देखील त्यांनी केली नाही. आणि यामुळेच मार्केटची ही अवस्था झाली आहे. मार्केटचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत एक टीम करुन संपूर्ण सर्वे करुन त्यानुसार लवकरच कारवाई केली जाणार आहे. तसेच ठिकठिकाणी कचरापेटी व तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. जेणेकरुन लोकांना व दुकानदारांना त्रास सहन करावा लागणार नाही. असे मोन्सेरात यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

सध्या गटारांची साफसफाई व त्यावर ढाकण्यात आलेल्या सिमेंट ब्लॉक बदलणे हा मुख्य विषय आहे. मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या साचल्याने सर्व गटारे तुंबलेली आहेत. तसेच गेली कित्येक वर्षे या गटारावरील सिमेंटचे ब्लॉक उघडे न केल्याने ही फुटण्याच्या स्थितीत आहेत. हे सिमेंट ब्लॉक बदलणे गरजेचे आहे. यासंबधी कामगारांना सुचना देण्यात आले असून लवकरच कामे हाती घेणार आहे. असे महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी सांगितले.

दुकानदारांनी पुढाकार घेणे आवश्यकः बाबुश मोन्सेरात

दुकानदार नेहमीच तक्रारी घेऊन पालिकेकडे येत असतात. परंतु असे न करता स्वतःह पुढाकार घेऊन कामे करायला हवी. सुरक्षारक्षक द्यावे अशी मागणी ते करतात पण नगरपालिका सुरक्षारक्षक मोठय़ा प्रमाणात देऊ शकत नाही यासाठी दुकानदारांनी एकत्र येऊन वर्गणी जमा करुन सुरक्षारक्षक ठेवावे. यासाठी नगरपालिकातर्फे त्यांना सहकार्य करेल असे मोन्सेरात यांनी पूढे सांगितले.