|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात पार्किंगसाठी रात्री 10 ते सकाळी 8 शुल्क नाही

पुण्यात पार्किंगसाठी रात्री 10 ते सकाळी 8 शुल्क नाही 

ऑनलाईन टीम / पुणे

पुण्यात रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून ही मंजुरी देण्यात आली आहे. दुचाकीसाठी तासाला 2 ते 4 रूपये तर चारचाकी गाडीसाठी 10 ते 20 रूपये तासाला मोजावे लागणार असून रात्री दहा ते सकाळी आठ पर्यंत कोणतेही पार्किंग शुल्क न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने संपुर्ण शहरभर पे अ‍Ÿन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराचे वेगवेगळे झोन करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि क झोनमध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहे. दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी 2 रूपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी 4 रूपये आकारण्यात येणार आहेत. तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी 10 आणि 20 रूपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. रात्री पार्किंगसाठी रात्री 10 ते सकाळी 8 असा कालावधी असेल. 10 रूपये एका दिवसासाठी आकारण्यात येतील. शुल्क मोजनीचा प्रस्ताव पुणे महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

 

Related posts: