|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजप अध्यक्ष शाह यांनी विरोधी पक्षांना दिले आव्हान

भाजप अध्यक्ष शाह यांनी विरोधी पक्षांना दिले आव्हान 

गुवाहाटी

 अविश्वास प्रस्तावाप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी विरोधी पक्षांना आव्हान दिले आहे. विरोधकांनी गोंधळ थांबवून सभागृहात अविश्वास प्रस्ताव मांडावा, भाजप यासाठी तयार असून सरकारला पूर्ण बहुमत प्राप्त असल्याचे शाह यांनी म्हटले. काँग्रेसने पत्र लिहून लोकसभा महासचिवांकडे 27 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची अनुमती मागितली आहे. या अगोदरच तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. काँग्रेसच्या सरकारने 10 वर्षांच्या कार्यकाळात आसामसाठी काय केले हे राहुल गांधी यांनी सांगावे, असे म्हणत शाह यांनी काँग्रेस अध्यक्षांना लक्ष्य केले. आसाममधील भाजप कार्यकर्त्यांना शाह यांनी शनिवारी संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचा विजयरथ ईशान्य भारतात पुढे जात राहील आणि 2019 ची लोकसभा निवडणूक देखील भाजपच जिंकणार असल्याचा दावा शाह यांनी यावेळी केला.  मागील लोकसभा निवडणुकीत ईशान्य भारतात भाजपने केवळ 8 मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता, परंतु पुढील निवडणुकीत आम्ही 25 पैकी 21 मतदारसंघात विजय मिळवू असे विधान शाह यांनी केले.