|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » देशभरात रामनवमी उत्सवात साजरी

देशभरात रामनवमी उत्सवात साजरी 

ऑनलाईन टीम / पुणे :

आज संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. विविध ठिकाणी फोटोंच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमीच्या निमीत्ताने शिर्डीत जवळपास दोनशे पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून, हजारो पदयात्रींनी शिर्डी फुलून गेली आहे.

साईभक्तांच्या सुरक्षेची, राहण्याची, भोजनाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी नाचवत हा उत्सव साजरा केला जात असल्याने, रामनवमी उत्सवाला रंगत आली. तर दुसरीकडे अयोध्येतही रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी अयोध्येतील हनुमानगढीवर भक्तांची मोठी गर्दी केली होती. शेकडो रामभक्तांनी हनुमानगढीवर येवून हनुमानाचे दर्शन घेतले, आणि पूजा केली. त्याशिवाय, अयोध्येतील विविध मठांमध्ये रामजन्मोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. रामनवमीनिमित्त मठांमध्ये रामजन्मोत्सव कार्यक्रमासोबतच प्रवचन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी एटीएस आणि आरएएफच्या तुकडय़ा अयोध्येत दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय, ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्हीच्या मदतीनेही सर्वत्र नजर ठेवली जात आहे.