|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा दीडपट अधिक भाव देण्याचा प्रयत्न : मन की बातमधून मोदींचे आश्वासन

शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा दीडपट अधिक भाव देण्याचा प्रयत्न : मन की बातमधून मोदींचे आश्वासन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 42व्या भागामध्ये देशवासीयांना संबोधित केले आहे. यावेळी मोदींनी स्वच्छता, शिक्षण, कृषी, ओद्योगिक विकास, अशा विविध विषयावर संवाद साधला आहे. मोदींनी आपल्याला शेतकऱयांनी पत्राच्या व्यवहारातून विचारलेल्या हमीभावाबद्दल केलेल्या विचारनेचा उल्लेख करत, सरकार शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, लोहिया, चौधरी देवीलाल यांनी शेती आणि शेतकरी हे देशाची अर्थव्यवस्था व सामान्य जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. शेतकऱयांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी देशातील कृषिबाजारांमध्ये सुधारणा घडवण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून, शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मोदी म्हणाले.

मन की बातमध्ये मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा आवर्जुन उल्लेख केला. आंबेडकरांनी भारताच्या औद्योगिकरणाचे मत मांडून औद्योगिक शक्ती म्हणून भारताचे स्वप्न पाहिले होते. डॉ. आंबेडकरांचे व्हिजन प्रेरणादायी आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या मागास आणि गरीबांची प्रेरणा आहेत, असे मोदी म्हणाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान संपूर्ण देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

 

Related posts: