|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांच्या नावाने सोशल मीडियावर भलताच संदेश

मुख्यमंत्र्यांच्या नावाने सोशल मीडियावर भलताच संदेश 

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबाबत सध्या सोशल मीडियामध्ये जे काही माहिती प्रसिद्ध होत आहे त्याचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यालयाने साफ इन्कार केला आहे.

गेले आठ दिवस ऍपलचे माजी चेअरमन स्टीव्ह जॉब यांचे 2011 साली सादुपिंडाच्या कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. मरण्याच्या काही दिवस अगोदर त्यांनी एक संदेश आपल्या नावे सोशल मीडियावर टाकला होता. त्यात त्यांनी आपल्या जीवनातील कारुण्य अनुभव व इतर काही माहिती दिली होती. ती वाचल्यानंतर सहाजिकच वाचकांना त्या व्यक्तीबद्दल दया उत्पन्न होते. अलिकडे काही जणांनी या जुन्या संदेशाचा वापर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावावर केला आहे. जेथे स्टिव्ह जॉब यांनी आपले नाव दिले होते त्या जागी मनोहर पर्रीकर यांचे नाव टाकण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आयटी क्षेत्रा असा उल्लेख आहे त्याठिकाणी पॉलिटीक्स असा उल्लेख केलेला आहे. शेवटी इंग्रजीतून मनोहर पर्रीकर असे नाव टाईप करण्यात आले आहे. संपूर्ण संदेश हा मराठीतून आहे आणि त्यात काही अक्षरे इंग्रजीतून घालण्याचा प्रयत्न केला आहे. वाचल्यानंतर हा संदेश खोटा आहे याची प्रचिती सर्वांना आलेली आहे. तथापी, गेले आठ दिवस प्रत्येक जण एकमेकांना हा संदेश ग्रुपमधून आणि व्यक्तिगत पातळीवर देखील पाठवित आहेत. या संदेशामुळे प्रचंड गोंधळ माजलेला आहे.

हा संदेश कुठूना कुठून तो मुख्यमंत्र्यांपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचला. त्यामुळे रविवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ट्वीटरद्वारे कळविण्यात आले की हा संदेश पूर्णतः बनावट आहे आणि त्याचा मुख्यमंत्र्यांशी दुरान्वये संबंध नाही. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्वीटरद्वारे वा अन्य माध्यमाद्वारे ते संबंधितांशी संपर्कात आहेत.