|Sunday, March 29, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘व्हिओ व्हि 9’ लाँच

‘व्हिओ व्हि 9’ लाँच 

ऑनलाईन टीम / पुणे :

‘व्हिओ व्हि 9’ हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. लाँचिंगपूर्वीच या फोनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. ‘व्हिओ व्हि 9’सध्या प्री-बुकींग फ्लिपकार्डवर करता येणार आहे.

व्हिओच्या रिअर कॅमेराची डिजाईन व्हरटीकल मोडमध्ये आहे. दरम्यान, या स्मार्टफोनचे फिंगरपिंट सेन्सर बॅक साईटलाच ठेवण्यात आले आहे. या स्मार्टफोनची सर्वात मोठी विशेषता कॅमेरा हीच की यात, 24 मेगापिक्सेलचा प्रंट कॅमेरा विथ ब्युटीमोडसह आहे, तर मागील कॅमेरा हा 16 + 5 मेगापिक्सेलचा आहे. क्वँलकॉम स्नॅपड्रगन 626 प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत 22,990 रूपये एवढी आहे. ‘व्हिओ व्हि 9’चा 19ः9 फुल एचडीप्लस डिस्प्ले आहे. बॅटरी ३२६० एमएएच कॅपॅसिटीसह उपलब्ध आहे. यामध्ये 4 जीबी रॅम तर 64 जीबी इंटर्नल स्टोरेज असून त्यात एक्सटरर्नल स्टोरेज 256 जीबीपर्यंतनी अधिक वाढवू शकतो. ‘एआर’ स्टिकरसह ‘एआय’ फेस ब्यूटी मोड सारख्या मनोरंजक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. 4 के व्हिडीओ रिकोर्डिंगसह ट्रीपल कार्ड स्लोट (सिम + सिम + मेमोरी कार्ड) ची उत्तम सुविधा देण्यात आली आहे. ‘व्हिओ व्हि 9’ हा ऍड्रोइड ओरिओ 8.1 वर आधारीत असून फेस अनलॉक स्मार्टरसुविधा देण्यात आली आहे.

यापूर्वी वीवोने आपला स्मार्टफोन V7 मध्ये 5.7 इंच आकाराची स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रगन 450 प्रोसेसर देण्यात आले होते. स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 32GB इंटर्नल स्टोरेज होते. भारतीय बाजारात V7 ची किंमत 16 हजार 990 रूपये ठेवण्यात आली होती.

News By- Nagesh Sonule

Related posts: