|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » पीएनबी खडतर स्थितीतून बाहेर येईल : पंजाब नॅशनल बँक

पीएनबी खडतर स्थितीतून बाहेर येईल : पंजाब नॅशनल बँक 

 पुणे / प्रतिनिधी :

पंजाब नॅशनल बँकेमध्ये सध्या निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच ग्राहक व भागभारकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली क्षमता व कर्तृत्व आहे. त्यामुळे या खडतर स्थितीतून बँक नक्कीच बाहेर येईल, असा पुनरुच्चार भारतातील या पहिल्या स्वदेशी बँकेने केला आहे.

स्वच्छ व जबाबदार बँकिंग हा पीएनबीचा एक संस्था म्हणून आधारस्तंभ राहिला आहे. अनैतिक पद्धतींना बँकेच्या प्रणालीत अजिबात थारा दिला जात नाही. ग्राहकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच कर्जे वसूल करण्यासाठी बँकेने तत्पर पावले उचलली आहेत, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी सर्व पीएनबी कर्मचाऱयांशी पत्रसंवादही साधला असून, ग्राहकसेवेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.

खडतर काळ कायम टिकत नाही, पण कणखर माणसे टिकतात. आपल्यासोबत बँकिंग करणाऱया काही ग्राहकांना या क्षणाला कदाचित थोडी चिंता जाणवत असेल. आपण त्यांच्या भावनांकडे संवेदनशीलतेने बघूयात आणि त्यांनी बँकेवर टाकलेला विश्वास आपण खऱया अर्थाने सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांना देऊ या. गेली अनेक वर्षे बँकेने आपल्या सर्व संबंधितांचा, ग्राहक, कर्मचारी, भागधारक, व्हेण्डर्स, नियमनकर्ते आणि सरकार यांचा विश्वास प्राप्त केला आहे. बँकेला वाढीच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी सरकारने अलीकडेच पाठिंबा दाखवला आहे. आपली बँक अत्यंत सुरक्षित आणि सशक्त आहे, याची खात्री मी तुम्हाला सगळय़ांना देतो, असे मेहता यांनी नमूद केले आहे.