|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » सभागृहात गोंधळ करणे थांबवा ; अन्यथा सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करावे लागेल-महाजन

सभागृहात गोंधळ करणे थांबवा ; अन्यथा सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करावे लागेल-महाजन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभेमध्ये विविध प्रश्नावरून होत असलेल्या आंदोलनामुळे सभागृहाचे कामकाज होत नसल्याने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन संतापल्या आहेत. हा गदारोळ थांबवा नाही तर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा इशारा महाजन यांनी दिला आहे.

 

बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाले. त्यावेळी खासदार वेलमध्ये आले आणि गदारोळ सुरू झाला. या संपूर्ण गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभा अध्यक्षा यांनी सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करत कामकाज चालवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण घोषणाबाजीमुळे कामकाज होऊच शकले नाही. त्यामुळे सुमित्रा महाजन संतापल्या आणि त्यांनी सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा इशारा दिला.

Related posts: