|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » अझारेन्का, स्टीफेन्स उपांत्य फेरीत

अझारेन्का, स्टीफेन्स उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ की बीस्केन, फ्लोरिडा

अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सने जर्मनीच्या माजी अग्रमानांकित अँजेलिक केर्बरला धक्का देत मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळविले. तसेच व्हिक्टोरिया अझारेन्कानेही उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.

अमेरिकन ओपन चॅम्पियन असलेल्या स्टीफेन्सने दहाव्या मानांकित केर्बरचा 6-1, 6-2 असा धुव्वा उडविताना 22 विजयी फटके मारले. माजी अग्रमानांकित खेळाडूवरील तिचा हा सलग दुसरा विजय आहे. आधीच्या फेरीत तिने गार्बिन मुगुरुझावर विजय मिळविला होता. ही स्पर्धा तीन वेळा जिंकलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काने जागतिक सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अझारेन्काचा हा या स्पर्धेतील सलग अकरावा विजय आहे. 2016 मध्ये ही स्पर्धा जिंकल्यापासून ती येथे आतापर्यंत अपराजितच राहिली आहे. अझारेन्का व स्टीफेन्स यांच्यात उपांत्य लढत होईल. गेल्या दोन वर्षात उपांत्य फेरी गाठण्याची अझारेन्काची ही पहिलीच वेळ आहे. मुलाचा ताबा मिळविण्यासंदर्भात न्यायालयीन खटला चालू असल्यामुळे ती सुमारे आठ महिने टेनिसपासून दूर होती.

Related posts: