|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » चंदा कोचर गोत्यात व्हिडीओकानचे 3 हजार कोटींचे कर्ज वादात

चंदा कोचर गोत्यात व्हिडीओकानचे 3 हजार कोटींचे कर्ज वादात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

व्हिडीओकॉन समुहाला 3350 कोटी रूपयांचे कर्ज दिल्याने आयसीअयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरू केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या 9 लाख रूपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे उघड झाले आहे.

धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱया कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावाने कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्मयांची भागीदारी होती. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.

 

 

 

 

Related posts: