|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन द्या ; माजी आमदारांची मागणी

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन द्या ; माजी आमदारांची मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र सध्या आर्थिक अडचणीत आहे. राज्यावर सध्या साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे. कर्मचाऱयांचा पगार देतांना सरकारच्या नाकी नऊ येत असतांना माजी आमदारांनी पेंन्शनवाढीसाठी डोके वर काढले आहे. माजी आमदारांना पेंन्शन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवून हवी आहे.

माजी आमदारांना सध्या वर्षाला 6 लाख म्हणजे महिण्याला 50 हजार रूपये पेन्शन मिळते. अजून त्यात वाढ करण्याची मागणी माजी आमदारांनी केली आहे. या मागणीसाठी माजी आमदारांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली.

माजी आमदारांच्या मागण्या

  • सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन वाढ द्या.
  • माजी आमदारांना वर्षातून 35 हजार किमीचा रेल्वेप्रवास मोफत असतो, त्यामध्ये अजून 50 हजार किमीपर्यंत मोफत प्रवासाची मुभा द्या.
  • मुंबईतील आमदार निवासात पाच ते दहा खोल्या राखीव ठेवा.
  • माजी आमदारांना रेल्वेतील द्वितीय श्रेणी एसीच्या प्रवासाचे भाडे मिळते. आता माजी आमदारांना वर्षातून 2 ते 3 विमानाच्या फेऱयांचा खर्च द्या.
  • माजी आमदारांना विशेष कार्यकारी अधिकाऱयाचा दर्जा देण्यात यावा.
  • सध्या राज्यात विधानसभेचे 695 तर विधानपरिषदेचे 139 माजी आमदार आहेत.

अधिवेशनाच्या आणि निवडणुकांच्या तोंडावर अनेक संघटना सरकारला कोंडीत पकडतात. पण कधीकाळी त्याच सरकारमध्ये आणि विरोधात असलेल्या आमदारांनी असे करणे योग्य आहे का ? निवृत्तीनंतरही आमदार, खासदारांचा भार सरकारच्या उरावर लादणे योग्य आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. दुसरीकडे गिरीश गांधी, संजीवन रायकर यासारख्या काही माजी आमदारांनी मात्र ही पेन्शनवाढ नाकारली आहे.