|Saturday, March 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीयाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीयाला अटक 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

सुरक्षा यंत्रणेच्या टीम सोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये पंजाब इंटेलिजन्सच्या सहाय्याने आएसआयच्या इशाऱयावर दहशतवादी कारवाई करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून इसीसमध्ये भरती झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील मोगा जिल्हय़ातील धलेके गावचा रहिवासी असणाऱया आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱया रवि कुमार याला अटक करण्यात आली आहे. रवी कुमारकडे सेनेच्या अतिमहत्त्वाच्या संस्थांची व सेनेच्या वाहनांचे काही फोटो, संरक्षित क्षेत्रांची हाताने बनवलेले काही नकाशे, सेनेचे टेनिंग मॅन्युअल्सची फोटोकॉपी अशा काही गोष्टी मिळाल्या आहेत. त्याच्यावर ऑफीशियल सीपेट एक्टच्या कलम 3, 4, 5 आणि 9 अंतर्गत आणि आयपीसीच्या कलम 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएसआयच्या एका अधिकाऱयाने फेसबुकच्या माध्यमातून रविला सात महिन्यांपूर्वी हेरगिरीसाठी भरती केले होते. तो सेनेची विविध माहिती पाकिस्तानी अधिकाऱयांना देण्याचे काम करत होता. 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान तो आयएसआयच्या खर्चावर दुबईच्या दौऱयावरदेखील गेला होता. त्यानंतर मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून तो सतत पाकिस्तानी अधिकाऱयांच्या संपर्कात होता.

 

Related posts: