|Thursday, February 20, 2020
You are here: Home » क्रिडा » मार्करमचे शतक, डीव्हिलियर्सचे अर्धशतक

मार्करमचे शतक, डीव्हिलियर्सचे अर्धशतक 

द.आफ्रिका-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी : पहिल्या दिवशी द.आफ्रिकेचे वर्चस्व

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या व शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व राखले असून मार्करमचे चौथे कसोटी शतक व एबी डीक्हिलियर्सच्या अर्धशतकाच्या बळावर त्यांनी दिवसअखेर 88 षटकांत 6 बाद 313 धावा जमविल्या होत्या. मार्करमने 152 तर डीक्हिलियर्सने 69 धावांचे योगदान दिले.

चार कसोटींच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-1 अशी आघाडी याआधीच मिळविलेली आहे. तिसऱया कसोटी बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाची बरीच नाचक्की झाली आणि त्या धक्क्मयातून हा संघ अजून सावरलेला दिसत नाही. खेळपट्टीकडून सीम मुव्हमेंट मिळत असूनही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना रोखता आले नाही. विशेषतः मार्करम व डीक्हिलियर्स यांना. द.आफ्रिकेने तीनही सत्रात धावांचा वेग कायम राखताना पहिल्या सत्रात 28 षटकांत 88, दुसऱया सत्रात 27 षटकांत 89 आणि तिसऱया सत्रात फटकेबाजी झाल्याने तब्बल 136 धावा फटकावल्या गेल्या.

 डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि एल्गार व मार्करम यांनी अर्धशतकी सलामी देत पहिल्या गडय़ासाठी 53 धावा जमविल्या. एल्गार 47 चेंडूत 19 धावा काढून बाद झाला. लियॉनने त्याला सेयर्सकरवी झेलबाद केले. मार्करम व आमला यांनी दुसऱया गडय़ासाठी 89 धावांची भर घातली. कमिन्सने ही जोडी फोडताना आमलाला 27 धावांवर बाद केले. 81 चेंडूत त्याने 3 चौकार मारले. यानंतर मार्करमला डीक्हिलियर्सकडून चांगली साथ मिळाली. या दोघांनी सावध व अधूनमधून आक्रमक फटके मारत धावांची गती वाढविली आणि तिसऱया गडय़ासाठी 105 धावांची शतकी भागीदारी केली. मार्करमने कसोटीतील चौथे शतक नोंदवताना 216 चेंडूत 17 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 152 धावा काढल्या. यावेळी द.आफ्रिकेच्या 3 बाद 247 धावा झाल्या होत्या. पण डु प्लेसिसही याच धावसंख्येवर पहिल्या चेंडूवरच शून्यावर पायचीत झाला.

डीक्हिलियर्स-बहुमा यांनी धावसंख्या तीनशेच जवळ नेली असताना 299 धावसंख्येवर डीव्हिलियर्स तंबूत परतला. त्याला पदार्पणवीर चॅड सेयर्सने पेनकरवी बाद केले. त्याचा हा पहिला कसोटी बळी होता. डीव्हिलियर्सने 119 चेंडूत 7 चौकार, एका षटकारासह 69 धावांचे योगदान दिले आणि बहुमासमवेत 52 धावांची भर घातली. 299 याच धावसंख्येवर सेयर्सने रबाडालाही बाद केल्यावर द.आफ्रिकेची स्थिती 6 बाद 299 अशी झाली. या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी थोडेफार वर्चस्व मिळवित यजमानांचे एकूण 4 बळी मिळविले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 88 षटकांत 6 बाद 313 धावा जमवित पहिल्या दिवशी वर्चस्व गाजविले. बहुमा 25 व डी कॉक 7 धावांवर खेळत होते. ऑस्टेलियातर्फे कमिन्सने 3, सेयर्सने 2, लियॉनने एक बळी मिळविला

धावफलक : दक्षिण आफ्रिका प.डाव-एल्गार झे. सेयर्स गो. लियॉन 19 (47 चेंडूत 2 चौकार), मार्करम झे. मार्श गो. कमिन्स 152 (216 चेंडूत 17 चौकार, 1 षटकार), आमला झे. हँडस्कॉम्ब गो. कमिन्स 27 (81 चेंडूत 3 चौकार), डीव्हिलियर्स झे. पेन गो. सेयर्स 69 (119 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), डु प्लेसिस पायचीत गो. कमिन्स 0 (1 चेंडू), बहुमा खेळत आहे 25 (50 चेंडूत 2 चौकार), रबाडा झे. रेनशॉ गो. सेयर्स 0 (2 चेंडू), डी कॉक खेळत आहे 7 (12 चेंडूत 1 चौकार), अवांतर 14, एकूण 88 षटकांत 6 बाद 313.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-53, 2-142, 3-247, 4-247, 5-299, 6-299.

गोलंदाजी : हॅझलवुड 18-3-60-0, सेयर्स 26-6-64-2, कमिन्स 19-3-53-3, लियॉन 21-1-95-1, मिशेल मार्श 3-0-23-0, रेनशॉ 1-0-4-0.

Related posts: