|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ट्रकची वीज खांबाला धडक, कारचे नुकसान

ट्रकची वीज खांबाला धडक, कारचे नुकसान 

प्रतिनिधी/ वाळपई

होंडा औद्योगिक वसाहतीत एका ट्रकने वीज खांबाला धडक दिल्यामुळे वसाहतीमधील यंत्रणा कोलमडून पडली. दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योगांना मोठा फटका बसला. तसेच एका कारचीही मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. आज शनिवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अपघातामुळे तीन लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

होंडा औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी सकाळी एक ट्रक सामान घेऊन आला होता. त्यावेळी त्याची एका वीजखांबाला धडक बसल्याने चार खांब मोडून पडले.  त्यातील एक खांब पार्क करून ठेवलेल्या कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडला त्यावेळी दुर्दैवाने तेथे कोणीच नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उद्योगातील काम ठप्प झाले. त्यामुळे लाखोंची नुकसानी झाली आहे, अशी माहिती उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण ब्लँगन यांनी दिली.

वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून संबंधितावर गुन्हा नोंद केला आहे. वीज खात्याच्या अधिकाऱयांनी घटनेची पाहणी केली. संध्याकाळी उशीरापर्यंत वीजयंत्रणा दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: