|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » सांगली महापालिकेत काँग्रेस नगरसेविकेचा गोंधळ

सांगली महापालिकेत काँग्रेस नगरसेविकेचा गोंधळ 

ऑनलाईन टीम / सांगली :

सांगली महापालिकेच्या महासभेत आज काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. आयुक्तांकडून आपल्या प्रभागाच्या फाईल्स् मंजूर होत नसल्याचा आरोप करत, दगडाने आपले डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांची फाईल आयुक्तांकडे सादर केली होती. पण आयुक्त विकासकामांच्या फाईल्स मंजूर करत नाहीत, असा काही नगरसेवकांचा आरोप आहे. या कारणावरून काँग्रेसच्या सुरेखा कांबळे या नगरसेविकेने हा प्रताप केला. यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. नगरसेविका कांबळे यांना आवरण्याताना इतर महिला नगरसेविकांची मोठी मेहनत घ्यावी लागली. सांगली महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. त्यातच महापालिकेतील विद्यमान नगरसेवक आपापल्या प्रभागातील नवनवीन विकासकामे मार्गी लावण्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहेत.