|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

चंद्र, शुक्र प्रतियुती व मंगळ, शनि युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तुमचा रागाचा पारा वाढवण्याचा प्रयत्न कुणीतरी करेल. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही परिस्थितीचा आढावा घ्या. निर्णय पुढील आठवडय़ात घेता येईल. घाई नको. धंद्यात, नोकरीत सर्वच ठिकाणी नम्रता ठेवा. गैरसमज व वाद होईल. संसारात जीवनसाथी व मुले यांचे सहकार्य मिळेल. कोर्टकेसमध्ये कमीच बोला.


वृषभ

तुमच्या क्षेत्रात जी समस्या असेल ती लवकर सोडवा. महत्त्वाची कामे याच सप्ताहात पूर्ण करा. मंगळ, शनि युती व चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात लक्ष द्या व नवीन काम मिळवा. राजकीय, सामाजिक कार्यात योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. नोकरीत तत्परता व तडजोड करा. कोर्टकेसमध्ये कठीण परिस्थिती होऊ शकते. कुटुंबातील समस्या प्रेमाने सोडवा.


मिथुन

मंगळ, शनि युती व सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर प्रवासात सावध रहा. संसारात वाद होईल. धंद्यात मोठे काम मिळेल ते घ्या व पूर्ण करण्याची जिद्द ठेवा.  राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. मान- सन्मानाचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन मोठे परिचय होतील. उत्साह वाढेल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्टकेस जिंकता येईल. परीक्षेत यश मिळेल.


कर्क

सप्ताहाच्या सुरुवातीलाच जास्त महत्त्वाची कामे करा. शुक्रवार, शनिवार संतापजनक कृत्य घडेल. जमिनीसंबंधी कामात वाद होईल. अडचणी येतील. राजकीय- सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा उजळेल. योग्य प्रयत्न करा. वरि÷ तुमच्यावर नवीन जबाबदारी टाकतील. कोर्टकेसमध्ये यश प्रयत्नाने खेचून आणता येईल. धंद्यात काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेत कष्टाने यश मिळेल.


सिंह

पंचमात होणाऱया मंगळ, शनि युतीमुळे मुलांच्याबरोबर मतभेद होतील. जमिनीसंबंधी कामात अडचणी येतील. पोराची काळजी घ्या. चंद्र, गुरु युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कार्याचा प्रसार होईल. लोकसंग्रह वाढवता येईल. धंद्यात कामगारांचा कटू अनुभव येऊ शकतो. कोर्टकेसमध्ये वाद होईल. प्रति÷ा धोक्मयात  आणण्याचा प्रयत्न विरोधक करतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेसाठी मेहनत घ्या यश मिळेल.


कन्या

याच सप्ताहात रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. प्रत्येक दिवस प्रगतीकारक ठरेल. संतापावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. जवळच्या सरकारी वर्गाशी प्रेमाने वागा. तुटकपणा ठेवू नका. धंदा मिळेल कसा होईल यावर लक्ष ठेवा. पैसा जमा करा. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात विरोधक करू नका. संसारात नाराजी होऊ शकते. मार्ग मिळेल.


तुळ

मंगळ, शनि युती व शुक्र शनि त्रिकोण योग होत आहे. बंधू भगिनीमध्ये  तणाव होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात नम्रतापूर्वक भाष्य करा. धंद्यात अडचणी येऊ शकतात. व्यवहारात सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोर्टकेसमध्ये मनावर  दडपण येईल. शांतपणे उपाय शोधा. परीक्षेसाठी सरळ मार्गाने तयारी करा, यश मिळेल. संसारात जबाबदारीने कामे करावी लागतील.


वृश्चिक

सूर्य, बुध युती व सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला संसारात समस्या येईल. वाद होईल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय याच सप्ताहात घ्या. लोकांच्या विरोधात जाऊन कामे होणार नाही. धंद्यात खर्च वाढेल. जमिनी संबंधी कामात अडथळे येतील. डोळय़ांची काळजी घ्या. उष्णतेचा त्रास होऊ शकतो. कोर्टकेसमध्ये  यशासाठी प्रयत्न करता येईल. परीक्षेसाठी मेहनत घ्यावी.


धनु

बुधवार, गुरुवार तणाव व संघर्ष करावा लागेल. किरकोळ दुखापत होऊ शकते. सावध रहा. कायदा मोडू नका. वाद वाढवू नका. मंगळ, शनि युती व चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. त्यामुळे समस्येवर उपाय शोधता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात स्पष्ट बोलण्यामुळे शत्रूत्व तयार होईल. कोर्टकेसमध्ये मुद्दे फारसे प्रभावी ठरणार नाहीत. जमिनीच्या कामात चिंता वाटेल. संसारात जबाबदारी वाढेल. इतरांना मदत करावी लागेल. दगदग होईल.


मकर

आपले सत्कार्य आपल्या उपयोगी पडणार आहे. अनोळखी माणसे मदत करतील. राजकीय सामाजिक क्षेत्रात नावलौकिक काढणार आहे. शेतीच्या कामात योग्य विचारांने कामे  कराल तर पुढील काळात चांगला फायदा संभवतो. जुनी येणी वसुल करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामाचा व्याप जास्त असणार आहे. महत्त्वाची कामे बुधवारपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थीवर्गाला ग्रहांची चांगली साथ आहे. प्रवासाचे बेत आखले जातील.


कुंभ

आपला मार्ग योग्य आहे याचा आत्मविश्वास असला तरी कधी तो चुकण्याची शक्मयता असते, त्यामुळे अभिमान थोडा बाजूला ठेऊन थोरामोठय़ांचा सल्ला घ्या आणि मगच आपला निर्णय किंवा मार्ग निवडा. कला क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती संभवते. जीवनसाथीबरोबर वेळ घालवता येईल. अविवाहितांना विवाहाचा योग जुळून येईल. नोकरीत बदल करण्याचा विचार आला तरी तूर्तास थोडे थांबा. व्यवसायात भागीदारीत थोडे गैरसमज संभवतात. वाहन खरेदी करण्याचा विचार मनात येईल.


मीन

 मेहनतीचे फळ चांगलेच मिळते, आता थोडी ग्रहांची साथ नसल्याने थोडे अपयश आले तरी डगमगून जाऊ नका. प्रयत्नांवर जोर द्या. पुढे येणारा काळ खूप चांगला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पेचात अडकलेल्या लोकांना मार्ग मिळतील. आठवडय़ाची सुरुवात थोडी कटकटीची असणार आहे. प्रकृतीची थोडी काळजी घ्या. येणाऱया काळात मोठी उडी घेऊ शकाल. आर्थिक लाभ संभवतो. शेअर्स, उलाढालीत फायदा संभवतो. प्रेमप्रकरणात मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

Related posts: