|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » मकरंद अनासपुरे राजकीय रिंगणात, ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची केली स्थापना

मकरंद अनासपुरे राजकीय रिंगणात, ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची केली स्थापना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आपल्या अभिनयातून महाराष्ट्राला हसवणारा अभिनेता मकरंद अनासपुरे आता राजकारणाच्या रिंगणत उतरला आहे. आज महाराष्ट्र दिनी ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची स्थापना करून 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकाही आपण या पक्षामार्फत लढवणार असल्याचे जाहिर केले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेला असताना, त्यांच्या हक्कांसाठी मकरंद अनासपुरेने आता राजकारणात उडी घ्यायचे ठरविले आहे. दक्षिण सिनेमातील सुपरस्टार्स राजकारणात येऊन यशस्वी होण्याची अनेक उदाहरणे आहेत. नुकतेच सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत यांनीही आपले राजकीय पक्ष काढले आहेत. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून मकरंदनेही महाराष्ट्राच्या राजकारणात आपले नशीब आजमावयचे ठरविले आहे. महाराष्ट्रातील सिनेसृष्टीतील एका सुपरस्टारने आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू करण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. ‘नाम’ या संस्थेचे काम करत असताना, आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबीयांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. इतकी वर्षे झाली, तरी महाराष्ट्रातील एकही राजकीय पक्षाला शेतकजयांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. आजही महाराष्ट्रात शेतकजयांचे आत्महत्यासत्र सुरू असून, शेतकजयांना त्यांच्या न्यायहक्कांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि सत्तेत आल्यावर शेतकजयांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवूनच नंतर बाकीचे प्रश्न हाताळावेत, हा माझा आणि माझ्या पक्षाचा अजेंडा असेल, असे मत मकरंद अनासपुरेने व्यक्त केले आहे.