|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय युवा नेमबाजांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

भारतीय युवा नेमबाजांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे नुकत्याच झालेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भरघोस यश संपादन करणाऱया भारतीय कनिष्ठ नेमबाजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी 9 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कास्य अशी एकूण 22 पदकांची कमाई केली. पदक तक्त्यात भारताने दुस  रे स्थान पटकाविले. या स्पर्धेत चीनने 25 पदकांसह पहिले स्थान मिळविले आहे. या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत युवा नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी करून भारताचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक उज्ज्वल केल्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा अभिमान वाटत आहे. भारतीय युवा नेमबाजांचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटरवर अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नेमबाजी या क्रीडाप्रकारात यापूर्वी भारताच्या वरिष्ठ नेमबाजांनी मेक्सिकोत झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भरीव कामगिरी करताना 4 सुवर्ण, 1 रौप्य, 4 कास्य पदकांची कमाई केली