|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऑर्चड जमिनीतील घरे कायदेशीर करण्याचा विचार

ऑर्चड जमिनीतील घरे कायदेशीर करण्याचा विचार 

प्रतिनिधी/ पणजी

ऑर्चर्ड जमिनीतील घरे कायदेशीर करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी अगोदर अशा घरांचा अहवाल उपलब्ध करावा लागणार असल्याचे नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. ऑर्चड जमिनीत बेकायदेशीरपणे भूखंड पाडून त्यात बांधण्यात आलेल्या घरांचा आकडा बराच मोठा आहे.

ऑर्चड जमिनीत भूखंड विकत घेऊन हजारो घरे बांधण्यात आली आहेत. ऑर्चड जमिनीतील भूखंड स्वस्त मिळतात म्हणून ही घरे उभारली जातात. प्रादेशिक आराखडा कार्यान्वीत नसल्याने लोक अशा प्रकारे घरे बांधत आहेत. ही सर्व घरे बेकायदेशीर आहेत. अशी घरे कायदेशीर करण्यासाठी झोन बदलावा लागणार आहे. सरकार त्याबाबत विचार करीत आहे. झोन बदलून ही घरे कायदेशीर करता येतात. त्यासाठी विधानसभेत हा विषय मांडावा लागणार असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.

त्यासाठी अगोदर किती घरे ऑर्चड जमिनीत बांधण्यात आली आहेत हे पहावे लागेल. त्याचा अहवाल तयार करावा लागेल. मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीरपणे ऑर्चड जमिनीत भूखंड पाडून त्यांची विक्री करण्यात आली आहे. स्वस्त दरात मिळतात म्हणून हे भूखंड लोक विकतही घेतात. काही वेळा ऑर्चड जमिनींचे बेकायदेशीरपणे रुपांतरणही केले जाते. या सर्वच गोष्टींची पाहणी करावी लागणार असल्याचेही मंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.