|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विचार, आचार हीच जैन धर्माची खरी ओळख

विचार, आचार हीच जैन धर्माची खरी ओळख 

प्रा. वैजनाथ महाजन यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

जैन धर्म हा भारत देशातला प्राचिन धर्म आहे. भारतात साहित्य क्षेत्रात सर्वोच्च सन्मान करणारा ज्ञानपीठ पुरस्कार जैन पती-पत्नीने सुरु केला होता. आज हाच पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो. या पुरस्काराची रक्कम एकूण 10 लाख रुपये आहे. जैन धर्मीयांनी जैन धर्मातील आचार विचार सोडून काही करू नये. विचार आणि आचार हीच जैन धर्माची खरी ओळख आहे व यामुळेच जग जैन धर्माला मान देतो असे प्रतिपादन प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.

गोवा जैन मंडळ आयोजित महावीरजयंती कार्यक्रमात ते वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी गोवा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर, पत्रकार श्रीराम पचिंद्रे आणि इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझाचे सचिव गोरख मांद्रेकर उपस्थित होते.

जैन धर्मीयांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे पण आज कितीजण शेती करतात हाच प्रश्न आहे. जैन धर्मात बदल होत आहे. जैन धर्मातील आचार आणि विचार जैन धर्मीयांनी कधीच सोडू नये. धर्म फ्ढक्त आचाराने वाढत नाही तर विचारानेही वाढतो. विचार आणि आचार या दोघांचे संतुलन राखणे ही महत्वाची व फ्ढार मोठी जबाबदारी आज प्रत्येकाकडे आहे असेही प्रा. महाजन यांनी सांगितले.

यावेळी प्रा. महाजन संबोधित करतना म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री यांनीही भगवान महावीर यांच्या अहिंसेबद्दल आपली सहमती दर्शविली होती. महात्वा गांधी हे भगवान महावीर यांच्यावर प्रभावीत झाले होते.

मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, काहीतरी चांगले काम करण्यासाठी आपला जन्म होतो. खा, प्या, मजा करा ही विदेशी संस्कृती आहे मात्र आपली संस्कृती तशी नाही. आपल्या धर्मात सांगितले आहे की गप्प बसू नका. जैन धर्माचे मंदिर फ्ढाsंडा येथे उभारण्यात येणार असून त्याला आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी श्रीराम पचिंद्रे यांनी सांगितले की, प्रत्येक धर्माची तत्वे आहेत व ती आपण स्वीकारली पाहिजेत. प्रत्येक धर्माचा मुलाधार हा प्रेम आहे. आपण आपले कर्म करत राहिले पाहिजे. कर्म आहे तिथे धर्म आहे. कर्म, दया, क्षमा या गोष्टी जिथे नाहीत त्याठिकाणी धर्म नाही असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी जैन धर्मातील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

Related posts: