|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » ‘मोदी सरकार आल्यापासून रोजच एप्रिल फुल डे’- धनंजय मुंडे

‘मोदी सरकार आल्यापासून रोजच एप्रिल फुल डे’- धनंजय मुंडे 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

सरकारविरोधात राष्ट्रवादीने कोल्हापुरमध्ये दोन दिवसाच्या हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरूवात झाली आहे. हल्लाबोल सभेत बोलताना विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ‘मोदी सरकार आल्यापासून रोजच एप्रिल फूल डे’ असतो, अशी खोचक टीका केली.

भाजप-शिवसेना सरकारच्या साडेतीन वर्षाच्या कामकाजाच्या विरोधात हल्लाबोल आंदोलनासाठी आयोजित केलेल्या जाहिर सभेत अजित पवारांनी मोदी सरकारला धारेवर धरले. दोन दिवसांच्या हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात अजित पवार, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन केली. यावेळी ‘बळीचे राज्य येवू दे, इडा पिडा टळू दे’ अशी प्रार्थना या सर्व नेत्यांनी केली.