|Friday, November 15, 2019
You are here: Home » leadingnews » जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे :

जेष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे खासगी रूग्णालयात वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा अभिजीत वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे आज निधन झाले आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवडय़ांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता.

 

Related posts: