|Sunday, November 17, 2019
You are here: Home » क्रिडा » मियामी टेनिस स्पर्धेत इस्नेर अजिंक्य

मियामी टेनिस स्पर्धेत इस्नेर अजिंक्य 

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

मियामी मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या 32 वर्षीय जॉन इस्नेरने पुरूष एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हचा पराभव केला. सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपी ताज्या मानांकन यादीत इस्नेरने नवव्या स्थानावर झेप घेतली आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इस्नेरने व्हेरेव्हचा 6-7 (4-7), 6-4, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला. व्हेरेव्हने या लढतीत टायब्रेकरमधील पहिला सेट जिंकून इस्नेरवर आघाडी मिळविली पण त्यानंतर इस्नेरने पुढील दोन सेटस्मध्ये आपल्या अचूक बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर व्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात आणले. 2010 साली अमेरिकेच्या अँडी रॉडिकने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा इस्नेर हा अमेरिकेचा दुसरा टेनिसपटू आहे. हा अंतिम सामना अडीज तास चालला होता. मियामी टेनिस स्पर्धेत शनिवारी अमेरिकेच्या स्लोनी स्टिफेन्सने महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले होते. मियामी मास्टर्स स्पर्धेत यावेळी अमेरिकन टेनिसपटूंनी आपले वर्चस्व राखले.

Related posts: