|Monday, August 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्राथमिक आरोग्य केंद्रेही खासगी होणार ; 27 रोजी आदेश

प्राथमिक आरोग्य केंद्रेही खासगी होणार ; 27 रोजी आदेश 

महाराष्ट्रात प्रथमच प्रायोगिक तत्वावर 2 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय चालवणार खासगी संस्था

प्रतिनिधी/ तारा

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे अप्पर सचिव प्रमोद बलकवडे यांनी 27 रोजी अद्यादेश काढला आहे. त्यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि तळदेव व तापोळा ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे प्रायोगिक तत्त्वावर 1 वर्षाकरिता चालवण्यास देणे. त्यामुळे राज्यात प्रथमच सातारा जिह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एक ग्रामीण रुग्णालय हे खाजगी संस्था चालवणार असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी ही दोन शहरे वगळता सर्व तालुका दुर्गम आणि डोंगराळ असाच आहे. भौगोलिक परिस्थितीच्या कारणास्तव तेथे काम करण्यासही कर्मचारी जात नाहीत. सध्या असलेल्या तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्र, तापोळा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. याच कारणास्तव शासनानेच ही तीन रुग्णालये स्वयंसेवी संस्थेस प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यास देण्याच्या प्रस्तावाचा जीआरच 27 रोजी झळकला. इंडियन रेड क्रॉस सोसायटी पाचगणी संचलित बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस 1 वर्षाच्या कालावधीकरिता प्रायोगिक तत्त्वावर अटीशर्तीवर चालवण्यास देण्यात येणार आहे. त्या अटींमध्ये ही रुग्णालये बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस जसे आहे तसेच एक वर्षासाठी हस्तांतरीत करावे, या रुग्णालयात केवळ वैद्यकीय सेवा व राज्य शासन पुरस्कृत आरोग्य विषयी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे संस्थेवर राहील, आदी अटींचा यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान, यामुळे शासकीय 150 कर्मचाऱयांचे वादे होणार आहेत. त्यामुळे चर्चा सुरु आहे.

Related posts: