|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » फ्लिपकार्टच्या खरेदीसाठी ऍमेझॉनकडून चर्चा सुरू

फ्लिपकार्टच्या खरेदीसाठी ऍमेझॉनकडून चर्चा सुरू 

वॉलमार्टकडून 40 टक्के हिस्सा खरेदीसाठी प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील आपली प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टची खरेदी करण्यासाठी ऍमेझॉनकडून ऑफर सादर करण्यात येईल असे सांगण्यात येते. सध्या फ्लिपकार्ट कंपनी वॉलमार्टबरोबर भागीदारी करण्यासाठी चर्चा करत आहे. ऍमेझॉन आणि वॉलमार्ट या दोन्ही अमेरिकन कंपन्या असून भारतील ऑनलाई रिटेल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ऍमेझॉनने फ्लिपकार्टमधील मोठा हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रारंभिक चर्चा सुरू केली आहे. मात्र ही चर्चा कोणत्या पातळीवर पोहोचली आहे, याची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. फ्लिपकार्टची वॉलमार्टबरोबर भागीदारी होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये समझोत्याची शक्यता कमी आहे.

सध्या देशातील ऑनलाईन बाजारात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टचे वर्चस्व आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यामध्ये भागीदारी झाल्यास ऍमेझॉनचे एकछत्री अंमल स्थापन होईल. वॉलमार्ट फ्लिपकार्टमधील 40 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. ही चर्चा यशस्वी झाल्यास वॉलमार्टची आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठा करार असेल. वॉलमार्ट भारतातील ई व्यापार क्षेत्रात उतरण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढील 10 वर्षात देशातील ई व्यापार क्षेत्र 130 अब्ज रुपयांचे होणार आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये भागीदारी झाल्यास ऍमेझॉनचे आव्हान वाढणार असून कंपनीकडून किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेसाठी 325 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे.