|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचरा एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीची ‘रसिक’ प्रथम

आचरा एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीची ‘रसिक’ प्रथम 

वार्ताहर / आचरा:

 आचरा पिरावाडी येथील श्री तरुण संघ दक्षिणवाडा संस्थेच्या त्रियोग महोत्सव सोहळा 2018 निमित्त कै. लक्ष्मी सुभाष धुरी रंगमंचावर आयोजित एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीच्या चतुरंग प्रॉडक्शनच्या ‘रसिक’ एकांकिकाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

  स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – द्वितीय – सायलेंट स्क्रीम (कलांकुर ग्रुप, मालवण), तृतीय – पुरुषार्थ (चौकट क्रिएशन, रत्नागिरी), उत्तेजनार्थ – तू है मेरी किरण (नाटय़ अभिरुची, मुंबई), शेवटचो प्रयोग (वक्रतुंड थिएटर्स, नेरुर), अभिनय पुरुष – समर्थ पवार (पुरुषार्थ), अभिनय स्त्राrö पूनम आयरे (रसिक), दिग्दर्शन – विवेक गोखले (रसिक), नेपथ्य – समृद्धी आसोलकर (सायलेंट स्क्रीम).

 विजेत्यांना अनुक्रमे 7 हजार रुपये, पाच हजार रुपये, तीन हजार रुपये व चषक तसेच उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून आकाशवाणीचे उद्घोषक पंकज टिकोळे, नाटय़ दिग्दर्शक सुभाष चव्हाण, संस्कृती कला संवर्धन मुंबईचे अध्यक्ष रोहन तोडणकर यांनी काम पाहिले.