|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘आयडीए’चे संचालक कुपेकर यांचा सत्कार

‘आयडीए’चे संचालक कुपेकर यांचा सत्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गोकुळ दुध संघाचे संचालक रामराज कुपेकर यांची इंडियन डेअरी असोशिएशनच्या पश्चिम विभागाच्या कार्यकारणीवर संचालकपदाची संधी मिळाली. या निवडीबद्दल   चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चेअरमन विश्वास पाटील यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले कुपेकर यांचे हिंदी बरोबर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांना या पदावर काम करताना निश्चित फायदा होईल. अभ्यासू व कामाची आवड असणारे आमचे सहकारी कुपेकर हे या संधीचे सोने करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी कुपेकर यांच्या कामाची स्तुती करताना उच्च विचारसरणी व अभ्यासू संचालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. या निवडीमुळे कुपेकर यांना विभागीय तसेच देशभरातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची संधी अरुण नरके यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे असे सांगितले.

 रामराजे कुपेकर म्हणाले, मला मिळालेल्या या संधीचे मी सोने करेन. मिळालेल्या संधाचा वापर दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी गोकुळचे संचालक अरुण नरके, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, राजेश पाटील, माई चुयेकर, अनुराधा पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, विलास कांबळे, बाबा देसाई, सत्यजित पाटील, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.