|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » रॉयल एनफिल्डकडून 800 कोटीची गुंतवणूक

रॉयल एनफिल्डकडून 800 कोटीची गुंतवणूक 

चेन्नई / वृत्तसंस्था :

चालू आर्थिक वर्षात प्रकल्प क्षमता विस्तारण्यासाठी रॉयल एनफिल्डकडून 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तामिळनाडूतील वल्लम वडगल प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार आहे. 2018-19 मध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून पूर्ण क्षमतेने उत्पादन घेण्यात येईल. ओरागडम प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 9.5 लाख युनिट्सवर पोहोचली आहे.

कंपनीच्या वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. देशाबरोबरच विदेशातील मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे वल्लम वडगल प्रकल्पाची क्षमता मजबूत करण्यात येत आहे. चेन्नईमधील तंत्रज्ञान केंद्राचे बांधकाम यावर्षी पूर्ण होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढती मागणी आणि बदलत्या नियमांनुसार कंपनीकडून गुंतवणूक करण्यात येत आहे. थंडरबर्ड एक्स, क्लासिक गनमेटल ग्रे, स्टील्थ बॅक प्रकारची नवीन मॉडेल बाजारात आणण्यात येणार आहेत, असे आयशर मोटर्सचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितले. कंपनीकडून इंडोनेशिया आणि थायलंडमध्येही प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.