|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » वॉर्नरचाही अपील करण्यास नकार

वॉर्नरचाही अपील करण्यास नकार 

वृत्तसंस्था /मेलबोर्न :

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयात ऑस्ट्रेलिया संघातील माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ तसेच डेव्हिड वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट हे चेंडु कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी ठरले. या घटनेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठेला बराच धक्का पोहचला आहे. वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. तर बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाविरूद्ध स्मिथ आणि बँक्रॉफ्ट यांनी आव्हान देणार नसल्याचे याआधीच स्पष्ट केली आहे. आता डेव्हिड वॉर्नरनेही आपल्याला दिलेली शिक्षा मान्य असून त्याचा मी स्वीकार करीत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाला आपण कोणतेही आव्हान देणार नसल्याचे प्रतिपादन वॉर्नरने केले आहे. दोषी क्रिकेटपटूंना केलेल्या शिक्षेचा कालावधी अधिक असल्याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष ग्रेग डायर यांनी नापसंती दर्शवून शिक्षेत कपात करण्याची मागणी केली होते. ऑस्ट्रेलियाच्या या दोषी त्रिकुटाला बंदी शिक्षेविरूद्ध आव्हान देण्याची मुदत 11 एप्रिलपर्यंत आहे.