|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यातून सात लाख क्ंिवटल साखर होणार निर्यात

जिह्यातून सात लाख क्ंिवटल साखर होणार निर्यात 

प्रतिनिधी /सोलापूर :

सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटवणारी उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्याच्या वृत्ताला जिह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दुजारो दिला तर महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालिका आयुक्तांना पेढा देवून आनंद साजरा केला. मंजूरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच आनंद साजरा करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली.

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरकरांची गरज ओळखून 25 वर्षापूर्वीच उजनीधरण ते सोलापूर अशी शंभर किलोमीटरची जलवाहिनी टाकून सोलापूरकरांचा पाणीप्रश्न सोडवला होता. परंतु सोलापूरची हद्दवाढ होवून मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी अपुरे पडू लागले. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सोलापूरकरांना आजही तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. सोलापूरकरांचा पाणीप्रश्न संपवण्यासाठी दुहेरी जलवाहिनी होणे आवश्यक होते. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दुहेरी जलवाहिनीचा 110 एमएलडी क्षमतेचा 692 कोटींचा दुहेरी जलवाहिनीचा प्रस्ताव शासनाला पाठवला. एनटीपीसीकडून मिळालेले 250 कोटी, स्मार्टसिटी योजनेतील 200 कोटी दुहेरी जलवाहिनीला देवून उर्वरित निधीसाठी आयुक्तांनी शासनाला साकडे घातले होते. मार्च महिन्यात सोलापूर दौऱयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दुहेरी जलवाहिनी मंजूर करण्याचे आश्वासन सोलापूरकरांना दिले होते.