|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापुरात गारांसह अवकाळीचा तडाखा

कोल्हापुरात गारांसह अवकाळीचा तडाखा 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या करवीरवासियांना गुरुवारी संध्याकाळी गारांसह पडलेल्या पावसाने सुखावले. मात्र अचानक पाऊस आल्याने फेरीवाले, पादचारी यांची मात्र तारांबळ उडाली. शहरामध्ये सखल भागात पाणी साचले. ठिकठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसामुळे जयंती नल्यावरील मलनि:स्सारण केंद्राजवळील बंधारा ओव्हरफ्लो झाला.

  जोतीबाची चैत्र यात्रेच्या परतीच्यावेळी गुलालाने माखलेला डोंगर धुण्यासाठी पाऊस हमखास हजेरी लावतो. मात्र यंदा यात्रेनंतर दोन दिवसांनी पावसाने शहर परिसरात हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली होती. पाऱयाने चाळीशी पार केली होती. वातावरणात उष्मा वाढल्याने नागरीक हैरान झाले होते. कडक उन्हामुळे लाही लाही होत होती. त्यामुळे सकाळी 11 वाजलेपासूनच रस्त्यावरील वर्दळ मंदावत होती. दोन दिवसांपासून ढग दाटून येत होत. मात्र पावसाने हुलकावणी दिली. गुरूवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. सायंकाळी चार वाजणेच्या सुमारास मेघगर्जना आणि गारांसह पावसाने हजेरी लावली. अचानकपणे सुरू झालेल्य पावसामुळे रस्त्यावरील किरकोळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली. लक्ष्मीपुरी, शिंगोसी मार्केट, शाहूपुरी, रेल्वे स्टेशन,  पंत बाळेकुंद्री मार्केट मधील व्यापाऱयांना पावासाचा फटका बसला. काही ठिकाणी सकल भागात पावसाचे पाणी घुसल्याने व्यापाऱयांकडील भाजीपाला पाण्यासह वाहून गेला. व्हीनस कॉर्नर, जिल्हा परिषद रोड, खानवीलकर पेट्रोलपंपजवळील जयंती नाला येथील रस्त्यावर पाणी साचल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली. शहरातील पावसाचे पाणी जयंतीनाल्यात आल्याने मलनि:स्सारण केंद्राजवळील बंधाऱयावरून पाणी ओसंडून वाहत होते. सीपीआर चौक येथे झाडाची फांदी तुटल्याने या परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला. तर वाहतुकही खोळंबली होती.

Related posts: