|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » सलमान आजही तुरुंगातच ; जामिन अर्जावर उद्या सुनावणी

सलमान आजही तुरुंगातच ; जामिन अर्जावर उद्या सुनावणी 

ऑनलाईन टीम / जोधपूर :

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अटकेत असलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याचे जोधपूर सेशन कोर्टाने स्पष्ट केले . त्यामुळे सलमान खानला आजची रात्रही जेलमध्येच काढावी लागणार आहे.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये ’हम साथ साथ है’ चित्रपटाचे चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होते. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. सलमानने काळवीटाची शिकार केली तेव्हा त्याच्यासोबत अभिनेता सैफअली खान, नीलम केठारी, सोनाली बेंदे , तब्बू हेदेखील होते. त्यामुळे हे सर्वजण या खटल्यातील सहआरोपी होते. गुरूवारी जोधपूर न्यायलयात झालेल्या सुनावणीत सलमानला न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली व दहा हजार रूपयांचा दंड ठोठवला. त्यानंतर सलमानची रवानगी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. दरम्यान सलमान खानच्या वकीलांनी सेशन कोर्टात जामीनासाठी अर्ज केले होते. त्यावर सेशन कोर्टात आज झालेल्या सुनावणीत सलमान खानच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या सलमानाच्या जामिनावर निणर्य होणार असल्याचे कोर्टाने सांगितले. त्यामुळे सलमानला आजची रात्र तुरूंगातच काढावी लागणार आहे.

 

Related posts: