|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बिद्री’ची उर्वरित 369रूपये एफआरपीची रक्कम बँकेत जमा

बिद्री’ची उर्वरित 369रूपये एफआरपीची रक्कम बँकेत जमा 

प्रतिनिधी/ सरवडे

बिद्री ता. कागल येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेल्या एफआरपीनुसार कारखान्याकडून देय असलेली प्रतिटन 369 रुपयेप्रमाणे  13 कोटी 52 लाख 55 हजार रक्कम आज बँकेत जमा केली आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी दिली. जिह्यात एफआरपीनुसार ऊस ऊत्पादकाना दर देणारा हा सहकारातील पहिला कारखाना ठरला आहे.

देसाई म्हणाले, या चालू हंगामात 5 लाख 38 हजार टनाचे गाळप करून 6  लाख 95 हजार मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा 12.92 इतका आहे. कारखान्याची एफआरपी 2869 बसत असताना अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने 3100 रुपये दर जाहीर केला. त्यानुसार गाळप सुरु झाल्यानंतर 15 डिंसेबरपर्यत गाळप झालेल्या 1 लाख 71 हजार 961 टनाचे 53 कोटी 30 लाख विनाकपात 3100 रुपये प्रमाणे अदा करण्यात आले आहे. तथापि साखर दर घसरल्याने 16 डिसेंबरनंतर आलेल्या 3 लाख 66 हजार 544 टनाचे 2500 रुपये प्रमाणे 91 कोटी 63 लाख 60 हजार रुपये 31 मार्च पूर्वी देण्यात आले. जाहीर दरापैकी एफआरपीनुसार 369 रुपये प्रतिटन प्रमाणे 13 कोटी 52 लाख 55 हजार रुपयांचा भरणा आज संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खातेवर जमा करण्यात आला. तर उर्वरित 231 रुपयेची प्रतिटन रक्कम बँक उपलब्धतेनुसार सभासदांना अदा करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

देसाई पुढे म्हणाले, साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून 6 कोटी 98 लाख युनिट वीज उत्पादन केले आहे. तर वीजप्रकल्प अजूनही चार दिवस चालणार आहे. उत्पादीत वीजेपैकी कारखाना व को-जन प्रकल्पासाठी 1 कोटी 96 लाख 62 हजार युनिट वीज वापरण्यात आली. तर 5 कोटी युनिट महावितरणला विक्री केली आहे. यातून 30 कोटी 15 लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. यावेळी चिफ अकौटंट एस. ए. कुलकर्णी, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

Related posts: